येणाऱ्या हंगामात 'सोमेश्वर' प्रथमच करणार १२ हार्वेस्टरने ऊसतोडणी : १० ऑक्टोबरलाच कारखाना सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यशासनाने १५ ऑक्टोबरला राज्यातील साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली असून या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून १२ हार्वेस्टर, ९०० बैलगाडी, २९४ ट्रकट्रॅक्टर आणि १५० डम्पिंगच्या साहाय्याने अकरा ते साडेअकरा लाख में. टन उसगाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
चालू गळीत हंगामात सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३३ हजार ३०० एकरावर तुटून येणारी उसाची नोंद असून अकरा ते साडेअकरा लाख मे टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्ध पाहता १० ऑक्टोबरलाच कारखाना सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. कारखान्यातील सर्व अंतर्गत कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून ८ ऑक्टोबर पर्यंत सर्व कामे पूर्ण होणार आहेत. तसेच जुलै २०२० मध्येच ट्रकटॅक्टर, बैलगाडी यांच्याशी करार पूर्ण केले असून १० ऑक्टोबर पर्यंत ऊसतोडणी कामगार कारखान्यावर दाखल होणास सुरुवात होईल, राज्यातील कोविड चा प्रादुर्भाव पाहता साखर आयुक्त आणि साखर संघ ऊसतोडणी कामगारांबाबत सर्वच साखर कारखान्यांना नियमावली ठरवून देणार आहे.
गेल्या वर्षी कार्यक्षेत्रातील सभासदांना कारखान्याने पाच फुटी पट्टा पद्धत ऊस लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते, त्यानुसार संचालक मंडळाच्या अवाहनाला प्रतिसाद देत अनेक सभासदांनी पाच फुटी पट्टा पध्दत अवलंबली होती. त्यामुळे गेल्या वर्षी सोमेश्वर ने ७ हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोडणी केली होती. यावर्षी १२ हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोडणी होणार आहे. यासाठी संचालक मंडळाने हार्वेस्टर घेण्यासाठी कारखान्याच्या सभासदांनाच प्रोत्साहन दिले असून यासाठी कारखान्याने १५ लाख रुपये तीन वर्षे परत फेडीवर ऍडव्हान्स दिला आहे.
कोविड च्या प्रादुर्भावामुळे सोमेश्वर कारखान्यामार्फत दिवाळी साठी दिली जाणारी साखर या वर्षी दीड महिना आधीपासून वाटप करण्यात येणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
कार्यकारी संचालक राजेंद्र यादव -----------
देशात व राज्यात कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता व तसेच माहे नोव्हेंबर मध्ये "दिपावलीचा" सण येत असल्याने दिपावलीची साखर नेहणेकरीता गर्दी होऊ नये. यासाठी कारखान्याने दीड महिना आधी साखर वाटपाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर पासून दीड महिना आधी वाटप करण्यात येणार आहे. साखर खरेदीसाठी सभासद व कामगार यांनी गर्दी न करता सोशल डिस्टनसिंग चा वापर करून साखर खरेदी करावी. असे आवाहन यादव केले आहे.
COMMENTS