लोकनेते बाबालालजी काकडे यांची जयंती साजरी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत येथील बाबालाल साहेबराव काकडे विद्यालयात, १५ ऑक्टोबर सहकारमहर्षी बाबालालजी काकडे यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिपाली ननावरे यांच्या शुभहस्ते बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी आपल्या प्रास्ताविकात बाबांच्या कार्याची ओळख करून दिली. सहकार क्षेत्रात बाबांचे योगदान महत्त्वाचे आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून बाबांनी सभासदांचे अनेक प्रश्न सोडवले, असे मुख्याध्यापकांनी सांगितले विद्यालयातील शिक्षक श्री. भगत यांनी बाबांचे व्यक्तिमत्व, बाबांचा दानशूरपणा आणि बाबांचे सहकार क्षेत्रातील योगदान याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक श्री.खुडे यांनी केले तर आभार श्री. सूर्यवंशी यांनी मानले . या उपक्रमाचे कौतुक निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे तसेच मानद सचिव मदनराव काकडे व जेष्ठ संचालक भिमराव बनसोडे यांनी केले.
COMMENTS