वाणेवाडीत ऍक्टिव्ह सर्व्हेत ११ पॉझिटिव्ह : १०९५ कुटुंबांची तपासणी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत करण्यात आलेल्या ऍक्टिव्ह सर्व्हेत वाणेवाडी गावातील ६२ जणांपैकी ११ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
आज दि ९ रोजी वाणेवाडी गावातील १०९५ कुटुंबातीची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६२ संशयित रुग्ण आढळून आले. यांची तपासणी करण्यात आल्या नंतर यातील ११ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज दिवसभरात वाणेवाडी गावठाण, दत्तवाडी, चव्हाणवाडी, रामनगर, विकासनगर आणि मळशी याठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने ही तपासणी करण्यात आली.उद्या दि १० रोजी मुरूम या गावातील ११०५ कुटुंबाची तपासणी करण्यात येणार आहे.
COMMENTS