सावत्र बापाने केला मुलिवर बलात्कार : बारामती तालुक्यातील मोरगाव येथील प्रकार
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
सावत्र बापाने मुलीवर बलात्कार केल्याची घटना बारामती तालुक्यातील मोरगाव येथील शेरेचीवस्ती येथे घडली.
याबाबत पीडित मुलिच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून नराधम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुध्द बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिली. पहिल्या पतीचे निधन झाल्यामुळे आंतरजातीय विवाह करून दुसरा पती केला. शेरेचीवस्ती येथील एका पोल्ट्रीमध्ये हे दोघेही ही कामाला होते पहिल्या पतिचे दोन आपत्यांपैकी नऊ वर्षाच्या मुलिवर बापाची वाईट नजर पडली. मंगळवार दि.६ दुपारच्या वेळी पत्नी घराबाहेर गेली असता. मुलीवर बलात्कार केला. कोणालाही सांगायचं नाही अशी धमकी पिडीत मुलीला दिली. पीडित मुलगी घडल्या प्रकारामुळे घाबरून थेट आजोळी जेजुरी ता. पुरंदर येथे गेली. आजोळी सर्व प्रकार सांगितला. इकडे मुलगी दिसत नसल्याचे पाहून फिर्यादी महिलेने पतीला विचारपूस केली. पतीही निरूत्तर झाला, अखेर दुसऱ्या दिवशी पती-पत्नी दोघेजण फिर्यादीचे माहेर असलेल्या जेजुरी येथे गेले असता आरोपी पती घरी आला नाही घराजवळ पत्नीला सोडून गेला. माहेच्या नातेवाईकांनी घडलेल्या प्रकारची माहिती सांगितली, गुरुवार दि. 9 रात्री याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांकडे फिर्याद नोंदविण्यात आली .
COMMENTS