सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

राज्यात पहिल्यांदाच साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ पत्रकारांच्या हस्ते

राज्यात पहिल्यांदाच साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ पत्रकाराच्या हस्ते  

न्हावरे : प्रतिनिधी
प्रा.डॉ. दत्ता कारंडे

 समाजमनाचे , भावनांचे ,आणि परिस्थितीचे वास्तव प्रतिबिंब टिपून समाजाला डोळस बनवून नवी दृष्टी देणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार व संचालक मंडळाने पत्रकाराच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ केला आहे ही घटना संपूर्ण महाराष्टातील पत्रकारांचा एक आगळा वेगळा सन्मान असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोईटे यांनी केले.
न्हावरे ( ता.शिरुर ) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा २४ व्या गळीत हंगामाचे गव्हाणपूजन व गव्हाणीत उसाची मोळी टाकून कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सकाळचे पत्रकार प्रतापराव भोईटे , लोकशासनचे तालुका प्रतिनिधी व लोकमतचे पत्रकार प्रा.डॉ. दत्ता कारंडे प्रभातचे पत्रकार व तालुका पत्रकार संघाच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश मारणे , पुढारीचे पत्रकार संजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याच्या गळीत हंगामासाठी शुभेच्छा देताना प्रतापराव भोईटे बोलत होते. कोरोनाच्या संकट असल्याने स्थानिक पत्रकारांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला असलातरी हा संपूर्ण राज्यातील पत्रकारांचा सन्मान असल्याचे भोईटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना प्रा.डॉ. दत्ता कारंडे म्हणाले की ,सामाजिक आणि राष्ट्रीय विकासात लोकहिताची भूमिका घेऊन समाजातल्या सामान्य माणसाच्या भल्यासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून निर्भीडपणे बाजू मांडणारे , समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देणारे, आपल्या अंगी असलेल्या व्यासंगीवृत्तीने विविध क्षेत्रांवर ,परिस्थितीवर , घडामोडींवर अचूक भाष्य करणारे तसेच वास्तवाचे  खरेखुरे प्रतिबिंब टिपणारे पत्रकार हा समाजव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पत्रकारांच्या कार्याची , योगदानाची दखल घेऊन घोडगंगा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ पत्रकारांच्या हस्ते पार पडत आहे ; हा लोकशाहीच्या संपूर्ण चौथ्या स्तंभाचा मोठा गौरव आहे. पत्रकारांच्या हस्ते साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. म्हणून या संस्थेला व तिच्या प्रमुखांना मनापासून धन्यवाद .
घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत रावसाहेबदादा पवार यांच्या प्रेरणादायी कार्याचा व  समृद्ध विचारांचा वसा आणि वारसा घेऊन कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोकबापू पवार, सर्व संचालक मंडळ , सभासद ,उसउत्पादक शेतकरी बांधव अधिकारी ,कर्मचारी आपल्या प्रयत्नातून आणि अथक परिश्रमातून हा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे यशस्वी करतील. दरम्यान आगामी काळात घोडगंगा कारखाना प्रगतीच्या व विकासाच्या दिशेने निश्चितपणे वाटचाल करील अशी भावना डॉ. दत्ता कारंडे यांनी यावेळी गळीत हंगामास शुभेच्छा देताना व्यक्त केली. याप्रसंगी पत्रकार संजय गायकवाड व पत्रकार संघाच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश मारणे यांनीही कारखान्याच्या गळीत हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार उपाध्यक्ष अँड. रंगनाथ थोरात कारखान्याचे संचालक प्रा.सुभाष कळसकर ,बाबासाहेब फराटे , संतोष रणदिवे , जगन्नाथ जगताप , अर्जुन कोंडे , सुदाम साठे ,प्रशांत होळकर , बाळासाहेब ढमढेरे , उत्तम सोनवणे ,पोपटराव भुजबळ , बिरा शेंडगे , शालन काळे , मनिषा सोनवणे ,सचिन मचाले , दिलीप मोकाशी , नरेंद्र माने ,  शंकरराव फराटे ,रामअण्णा नागवडे ,दत्तात्रय फराटे , अनिल वाबळे , कार्यकारी संचालक प्रविण शिंदे मांडवगणचे सरपंच शिवाजी कदम , छायाचित्रकार पौलस गवई ,बाळाजी गोरे यांच्यासह कारखान्याचे सभासद ,उसउत्पादक शेतकरी अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7036,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : राज्यात पहिल्यांदाच साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ पत्रकारांच्या हस्ते
राज्यात पहिल्यांदाच साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ पत्रकारांच्या हस्ते
https://lh3.googleusercontent.com/-r6mPVivRpjc/X4ARgyIVFSI/AAAAAAAAFII/tBc97BowtsgACDwwbP5wVoFLYq-xzsBfgCLcBGAsYHQ/s1600/1602228551819429-0.png
https://lh3.googleusercontent.com/-r6mPVivRpjc/X4ARgyIVFSI/AAAAAAAAFII/tBc97BowtsgACDwwbP5wVoFLYq-xzsBfgCLcBGAsYHQ/s72-c/1602228551819429-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/10/blog-post_9.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/10/blog-post_9.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy