गडदरवाडी येथे होणार शहीद जवान नामदेव गडदरे यांचे स्मारक : स्मारकाचे भूमिपूजन संपन्न
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
देश सेवा बजावत असताना त्यांच्या टीमला अचानक आतंकवाद्यानी घुसखोरी केल्याची माहिती हाती लागते. आणि त्या ठिकाणी सर्व टीमसह जवान धाव घेतात. अन त्याच क्षणी चालू असलेल्या ऑपरेशन मध्ये प्राणाची बाजी लावून दोन आतंकवाद्यांना कंठस्नान देऊन आतंकवाद्याचा खात्मा केला जातो. परंतु 2 ऑक्टोंबर २००२ मध्ये झालेल्या चकमकीत
खिंड लढवत असताना त्या महाराष्ट्राच्या वीर पुत्राला वीरमरण येते. ही कहाणी आहे बारामती तालुक्यातील गडदरवाडी या छोट्याश्या गावातील. गडदरवाडी गावातील युवक देशाचे रक्षण करण्यासाठी काश्मीर भागात आपले कर्तव्य बजावत होता. 2 ऑक्टोंबर २००२ हा दिवशी काश्मीर मधील बारामुल्ला या ठिकाणी शृत्रुशी लढाई करताना धाराधीर्थी पडलेल्या शहीद जवान नामदेव गडदरे यांना वीर मरण येते.
गडदरवाडी येथे शहीद जवान नामदेव गडदरे यांचे स्मारक उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांचे गावात स्मारक उभे रहावे असे गावातील ग्रामस्थांची आणि त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती. ती पूर्णत्वास जाणार आहे. नामदेव गडदरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर, तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे , उपसरपंच संतोष गडदरे, परिसरातील आजी माजी सैनिक संघटनाचे प्रतिनिधी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
नामदेव गडदरे यांच्या स्मारकाच्या अर्धाकृती पुतळा गावातील ग्रामस्थ आणि आजी माजी सैनिक संघटनाचे प्रतिनिधी असे मिळून लोकसभागातून उभारण्यात येणार आहे.शहीद जवान नामदेव गडदरे यांचे बंधू माजी सैनिक संतोष गडदरे हे सुध्दा सैन्य दलात कार्यरत होते. विशेष म्हणजे दोघांचेही काश्मीर मध्ये पोस्टिंग होते.