पोलीस असल्याची बतावणी करून ३५ हजार लुटले : चौधरवाडी येथील प्रकार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आम्ही पोलीस आहोत, गाडीत गांजा आहे, आम्हाला गाडी तपासायची आहे, अशी खोटी बतावणी करून गाडीतील रोख रक्कम ३५ हजार रुपये लुटण्याचा प्रकार बारामती तालुक्यातील चौधरवाडी गावाच्या हद्दीत मोरगाव निरा रस्त्यावर घडला.
याबाबत सुरजमल जगन्नाथ माली वय 35 व्यवसाय डायव्हर रा.मोहना पोस्ट ईकलंगपुरा ता.राउतबाटा जि.चितोडगढ रा.राज्यस्थान यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १० रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निरा ते मोरगाव जाणारे रोडवर चौधरवाडी गावचे हद्दीत चढाचे वर फॉरेस्टजवऴ एका ट्रक मागुन एक काऴे रंगाचे बजाज विक्रांता मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी गाडी बाजुला घेण्यास सांगितली. गाडी बाजुला घेतल्यावर त्या तिघांनी संगणमताने आम्ही पोलीस चौकीवरुन आलो आहोत आम्ही पोलीस आहोत आम्हाला तुमचे गाडीत दारु ,गांजा, आफु आहेका हे चेक करायचे आहे असे सांगुन त्यापैकी एकाने गाडी चेक करण्याचे बहाण्याने गाडीत येवुन गाडीतील फिर्यादीने डिजेल साठी ठेवलेले ३५ हजार रुपये समतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरुन नेले आहेत. पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र फणसे व नितीन बोराडे करत आहेत
COMMENTS