गाड्यावरचा चहा आता .....खासदार, आमदार झालाय.....
सोमेश्वरनगर: प्रतिनिधी
चहा हा सकाळी उठला की लागतोच......गप्पा मारताना ....भेटण्याचे निमित्त असो की.... चहा घ्यायचा का ? असे आपुलकीने विचारपूस करत चहाचे निमंत्रण दिले जाते...कपभर चहात गोडवा असतो...आपुलकीने केलेली विचारपूस आणि प्रेम असते....पणं या चहाचे कौतुक का आपण करत आहोत.... चहा तर घरी पणं मिळतो...आणि बाहेर चहाच्या गाड्यावर... हॉटेल वर मिळतो हे काय नवीन आहे का.... हो पणं आता नव्या ब्रँड ने मिळणारा चहा याची चर्चा आणि त्या नावाने फेमस असलेली चहाची दुकाने आता चहा प्रेमींना भुरळ घालत आहेत.
साखरेचा चहा सगळीकडे मिळतो...तो कमी साखरेचा तर साखर नसलेला...पणं परिपूर्ण साखर असलेला चहा जिभेवर रेंगळ त तलब पूर्ण करतो...आता गुळाचा चहाची भर पडली हाय.
अमृततुल्य, प्रेमाचा चहा, श्रीनाथ अमृत तुल्य, नवनाथ टी स्टाल अशी अनेक नावांनी चहाची दुकानावरील पाट्या आपल्या नजरेस पडतात.
तसं बघितलं तर सर्वसामान्याच्या खिशाला परवड ल एवढं बजेट या चहाच्या कपाचे असते.भुकेला मारून तरतरी आणणारा चहा आता राजकरणात उतरलाय अस म्हणल तर वावग ठरणार नाय...हो कारणही तसच आहे.
आपला चहा आता खासदार, आमदार, सरपंच, उपसरपंच, सगळी पद भूषवून विराजमान झालाय. चहाच्या दुकानाला आता वरील पदाची नावे आल्याने चहा पिन्यासाठी दुकानांची नावे लोक आता खासदार, आमदार अशी नावे घेऊ लागलीत...त्यामुळे आपला चहा आता खासदार , आमदार झालाय .
COMMENTS