राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचेकडून भोसले कुटुंबियांचे सांत्वन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी जेष्ठ नेते शिवाजीराव भोसले यांच्या निधनामुळे बारामतीच्या पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. मित्राला शेवटच्या क्षणी भेटता न आल्याची खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि यांनी आपल्या जिवलग मित्राप्रती आदरांजली व्यक्त केली.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे (दि 30) रोजी निधन झाले होते. खासदार शरद पवार यांनी दि ३१ रोजी भोसले यांच्या वाणेवाडी येथील निवस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी भोसले यांचे चिरंजीव रमेश आणि प्रवीण भोसले, त्यांच्या तीनही मुली, सुना, नातवंडे यांच्यासह प्रतिभा पवार, ज्येष्ठ नेते बी. जी. काकडे, रघुनाथदादा भोसले, के वाय. जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, संचालक किशोर भोसले, लक्ष्मण गोफणे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, विक्रम भोसले, पोपटराव भोसले, बाबासाहेब भोसले, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनिल भोसले, अनिल भोसले, अजित भोसले यांच्यासह ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी शिवाजीराव भोसले यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत १९६७ सालापासूनचा राजकीय प्रवास उलगडला. त्यांच्या मुलांची नातवंडांची विचारपूस करत नातवंडांनी उच्च शिक्षण घेतल्याने पवार यांनी कौतुकाची थाप दिली.
सोमेश्वर साखर कारखाना सुरू झाला का असे पवार यांनी विचारले असता सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, चालू झाला आहे. अजून ऊसतोडणी कामगार येत आहेत. तसेच सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजला किती मुलं आहेत, याबाबत चौकशी केली. तर शिवाजीराव भोसले यांचे चिरंजीव प्रवीण भोसले यांना विचारले की हायकुल चं काम कोण बघत, आता किती मुले शिक्षण घेतात. सोसायट्या, पतसंस्थेचे काम कोण बघत याबाबत पवार यांनी अपुलकीने विचारपूस केली.
--------------------------
माझ्या वयाचे कोण आहे का ?
यावेळी पवार प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत होते. आता आमच्या वयाच कोण आहे का? असे पवार यांनी विचारत जेष्ठ नेते रघुनाथ भोसले, बी जी काकडे आणि के वाय जगताप याची आस्थेने विचारपूस केली
COMMENTS