मु.सा.काकडे महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी प्रा. जवाहर चौधरी
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील मुगटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. जवाहर चौधरी यांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयीन व्यवस्थापनचे अध्यक्ष सतिश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे यांच्यासह व्यवस्थापण सदस्य उपस्थित होते. चौधरी यांची निवड करण्यात आली असून त्यांच्याकडे प्राचार्यपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. प्रा. चौधरी गेेली २८ वर्षापासुन काकडे महाविद्यालयात भूगोल विषयाचे प्राध्यापक म्हणून काम पाहत आहेत.
COMMENTS