उपसभापती प्रदीप धापटे यांच्या वतीने ऊसतोडणी कामगारांना कपडे व खाऊचे वाटप
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप धापटे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. दरवर्षीप्रमाणे आजही प्रदीप (बापू) धपाटे मित्र परिवाराच्या वतीने ऊसतोड मजुरांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले.
प्रदीप बापू धापटे मित्र परिवाराच्या वतीने गेली अठरा ते वीस वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे. आठ दिवसापूर्वी विजयादशमीच्या मुहूर्तावर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला असून कोर्हाळे बुद्रुक परिसरात अनेक ऊसतोड मजूर बीड, नगर जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. जन्मताच कष्टाचा विडा उचललेल्या या मजुरांना दरवर्षी काही ना काही मदत करण्याचा मानस प्रदीप बापू धापटे मित्र परिवाराचा असतो. त्याच अनुषंगाने आज प्रदीप बापूंच्या शेतात ऊसतोड कामगारांना व त्यांच्या मुलांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. ऊसतोड कामगारांचे हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे तसेच ऊस तोड करताना संपूर्ण अंगभर कपडे घालता यावे हाच यामागचा उद्देश असल्याचे मत या कार्यक्रमावेळी उपसभापती प्रदीप बापू धापटे यांनी व्यक्त केले. यावेळी बापूंच्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आय.टी सेले अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी घेतला प्रदीप धापटे यांच्या वतीने गले चार वर्ष हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे अशी माहिती दिली . तसेच आशा प्रकल्पाचे तुषार जाधव व अजित खोमणे यांनीही अशा प्रकल्पाविषयी ऊसतोड मजुरांना माहिती देत मुलांना शाळेत पाठवण्याचं आवाहन केले. ऊसतोड मुकादम अनिल राणे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी रामदास धापटे, धनंजय पडवळ, संभाजी जाधव, दत्ता नलवडे,विनोद गाडे, सागर गाडेकर,अशोक कदम, बन्सी पानसरे, साहिल शिरसागर, योगेश साळुंखे, नंदकुमार कोंढाळकर, लखन कोंढाळकर, यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.
COMMENTS