सोमेश्वर कारखान्याचा उद्या गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभ
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ५९ वा गव्हाण पूजन व गळीत हंगाम शुभारंभ उद्या दि २५ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सकाळी १० वाजता पार पडणार आहे.
सोमेश्वर कारखान्याचे संचालक मंडळ यांच्या हस्ते शुभारंभ पार पडणार आहे. दरम्यान कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने सभासद, कामगार, हितचिंतक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात असे सांगितले आहे.
----------------------
ऊसतोड सुरू------------
राज्यातील साखर कारखानदारी सुरू करण्यासाठी राज्यशासनाने १५ ऑक्टोबर ही तारीख दिली होती. मात्र परतीच्या पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला त्यामुळे १ ऑक्टोबर ला सुरू होणारी साखर कारखानदारी सुरू होण्यासाठी नोव्हेंम्बर महिन्याचा पहिला आठवडा उजाडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अनेक कारखान्यांनी १५ ऑक्टोबरला ऊसतोडी सुरू केल्या मात्र त्यांना ऊसतोडी थांबवाव्या लागल्या. परतीच्या पावसाचा जोर अजूनही सुरूच आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दि २५ पर्यंत हा पाऊस राहण्याची चिन्हे आहेत.
कारखान्यांशी उचली घेऊन १ ऑक्टोबरचा करार केलेले ऊस तोडणी कामगार कारखान्याच्या दिशेने कूच करू लागले आहेत. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत सव्वाशे ऊसतोड टोळ्या दाखल झाल्या आहेत. बागायती भागातील उसामध्ये अजून पावसाचे पाणी आहे यामुळे शेतकी विभागाने रस्त्याच्या कडेला उसतोडी बसवल्या असून आज कारखान्यावर ऊस वाहतुक वाहने ऊस भरून कारखान्यावर दाखल झाली आहेत.
COMMENTS