बारामती तालुक्यात काल दिवसभरात एवढ्या जणांना झाली कोरोनाची लागण

Admin
बारामती तालुक्यात काल दिवसभरात एवढ्या जणांना झाली कोरोनाची लागण 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती टाकुक्यात काल दिवसभरात २५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ऍक्टिव्ह सर्व्हेत १७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २५ जणांपैकी  शहरातील ११ तर ग्रामीण भागातील १४ जनांचा समावेश आहे. 
कालचे शासकीय (दि २३)  एकूण rt-pcr नमुने ९०.    
एकूण पॉझिटिव्ह-११ . 
प्रतीक्षेत ००.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -४                      
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -८ त्यापैकी पॉझिटिव्ह -३.                   कालचे एकूण एंटीजन ४७ . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-११.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण २५   
शहर-११ . ग्रामीण- १४.             
एकूण रूग्णसंख्या-४०३९             
एकूण बरे झालेले रुग्ण- ३७९६   एकूण मृत्यू-- ११०
तसेच काल मानाजी नगर व धुमाळवाडी येथे" माझे कुटुंब माझी जबाबदारी "या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्याचे कोवीड संदर्भात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये  मानाजी नगर येथे ३१ संशयितांची एंटीजेन तपासणी केली असता त्यापैकी ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळूनआले तसेच धुमाळवाडी येथील २० संशयितांची तपासणी केली असता त्यापैकी ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून पणदरे येथील ४ संशयितांची एंटीजेन तपासणी केली असता २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत असे एकूण ५५ संशयित रुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी १७ रूग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
To Top