करंजेपुल येथील आत्महत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल येथील तुषार काळे या युवकांच्या आत्महत्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेष नाना भोसले, सोन्या नाना भोसले, शिल्पा नाना भोसले, पुजा उमेष भोसले, सोयल उमेष भोसले सर्व रा. निंबुत ता. बारामती जि. पुणे असे गुम्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत
बाळु कागल काळे रा. करंजेपुल ता. बारामती यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील व मोठा भाउ राजु यांच्या मध्ये घरगुती वाद चालु असताना फिर्यादी यांची सुन तेथे गेली असता फिर्यादी यांचा मुलगा तुशार याने त्यांची पत्नी शिवानी यास तु भांडणामध्ये पडु नकोस तेथे जावु नकोस असे म्हणाल्याच्या कारणावरूण वरील सर्व आरोपी यांनी फिर्यादी यांचा मुलगा तुशार यास हाताने लाथाबुक्यांने मारहान केली. याकारणावरूण तसेच फिर्यादी यांचा मुलगा तुशार बाबु काळे वय
यांचे लग्न झालेपासुन आरोपीनी यांनी घरगुती कारणावरून सतत मारहाण करून शिवीगाळ करून यांनी तुषार याच्या गळयावर सुरी फिरवील अशी धमकी देवुन फिर्यादी यांची सुन यास काही कारण नसताना वेळोवेळी माहेरी घरी जावुन दोन आठवडे त्यांच्या ठेवुन फिर्यादी याचा मुलगा तुषार यास सतत शारिरिक व मानसिक त्रास दिल्याने शारिरिक व मानसिक सततचे होना-या त्रासाला कंटाळुन फिर्यादी यांचा मुलगा तुषार बाबू काळे याने घराचे पत्राचे शेडचे अॅगलला गळफास लावुन आत्महत्या केलीली आहे. पुढील तपास पोसई. कवितके करीत आहेत.
COMMENTS