सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले असून आज पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
यापूर्वी याच्यावर लातूर येथील गांधी चौक पोलिस ठायात २०१४ रोजी एटीएम फोडण्यात गुन्ह्यात तो गेली सहा वर्षे फरार होता.
याच्यावर दि. ८ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल होताच
आरोपी रा. शेराचीवस्ती मोरगाव बारामती, जि.पुणे मुळ गाव बोकनगाव ता.जि.लातूर यास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर तसेच सपोनि, सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व पो.हवा.संजय मोहीते यांनी मुर्टी भागात पाठलाग करून पकडले.
सदर आरोपीचे मुळ गावाकडे सरपंच, पोलिस पाटील, बीट अंमलदार, लातूर ग्रामीण पोलिस ठाणे येथे सतत पाठपुरावा करून पोसई मुंढे यांनी चौकशी करून माहिती घेतली असता सदर आरोपी हा ATM फोडीच्या गुन्हयात ६ वर्षं पासुन फरारी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
COMMENTS