'माळेगाव'च्या सभासदांसाठी गोड बातमी : दिवाळीसाठी प्रतिटन मिळणार एवढी रक्कम
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सभासदांना दिवाळीसाठी १५० रुपये प्रतिटन जाहीर केले.
सोमवार दि २ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.यामध्ये खोडवा अनुदानाचे ५० रुपये, सभासद ठेवीचे ५० रुपये आणि मागील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाच्या पोटी ५० रुपये असे एकूण १५० रुपये प्रतिटन सभासदांना देण्याचे बैठकीत ठरले असल्याचे तावरे यांनी नमूद केले.
COMMENTS