सालपे घाटातून ट्रकसह तेहतीस लाखांची चोरी :
सातारा - नगर राज्य मार्गावरील घटना
लोणंद प्रतिनिधी,
लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे घाटात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास पुण्यातून माल घेऊन कोल्हापूर च्या दिशेने चाललेल्या ट्रकला अडवून सुमारे तेरा लाखांच्या मालासह ट्रक चोरल्याची घटना घडली आहे.
दिनांक १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास फलटण तालुक्यातील सालपे घाटाच्या पहिल्याच चढणीला पाठिमागुन मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल आडवी मारून ट्रक क्रमांक MH09CU9823 थांबवला. तसेच पाठिमागुन आणखी आलेल्या दोघांनी असे एकुण पाच जणांनी ट्रकचालक सचिन माणिक कोळी वय 36 रा. आचकनहल्ली ता. जत यास मारहाण करून फिर्यादीचे हात-पाय रस्सीने बांधून ट्रक सह घेऊन गेले व फिर्यादीस यवत ता.दौंड जि. पुणे येथे कुठेल्यातरी ओढ्याजवळ फेकून ट्रक मधील 12,92,636/- किमतीच्या लोखंडी पाइप , चॅनेल , अँगल असे लोखंडी साहित्य असलेल्या
मालासह सुमारे वीस लाख रू किंमतीचा भारतबेंझ कंपनीचा ट्रक घेऊन पळून गेले अशी फिर्याद लोणंद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी हे अधिक तपास करत आहेत.
COMMENTS