'सोमेश्वर' चा अंतिम दर ३००० : सभासदांना दिवाळीसाठी प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के बोनस
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे हंगाम सन २०१९-२०२० मध्ये गाळप
केलेल्या ऊसाकरीता प्रतिटन १०० रुपये तर कामगारांना १५ टक्के ऍडव्हान्स बोनस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याची माहिती अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वर ची एफआरपी प्र.मे.टन रु.२७८८.५१ इतकी आलेली असून सदर गाळप हंगामामध्ये कारखान्याने एकूण ९ लाख ३४ हजार मे.टन ऊसाचे गाळप केलेले आहे. कारखान्याने गाळप हंगाम सन २०१९-२०२० मध्ये गाळप केलेल्या ऊसाकरीता
आजपर्यंत एकूण रक्कम रु.२९००/- प्र.मे.टन याप्रमाणे केन पेमेंट अदा केलेले असून
सोमवार दि.२/११/२०२० रोजी पार पडलेल्या मा.संचालक मंडळाच्या सभेमध्ये आडसाली
ऊसाकरीता प्र.मे.टन रु.३०००/-, पुर्व हंगामी ऊसाकरीता रु.३०७५/- आणि सुरु व
खोडवा ऊसाकरीता रु.३१००/- प्र.मे.टन याप्रमाणे अंतीम ऊस बील देण्याचा निर्णय
घेतलेला आहे. सदर निर्णयास अनुसरुन दिपावली सणाकरीता आडसाली ऊसाकरीता
प्र.मे.टन रक्कम रु.१००/-, पुर्व हंगामी ऊसाकरीता रु.१७५/- व सुरु व खोडवा ऊसाकरीता रक्कम रु.२००/- याप्रमाणे ऊसबील सभासदांच्या खात्यावर दिपावली सणाअगोदर वर्ग करणेत येणार आहे. या ऊस बीलाबरोबरच सभासदांच्या ठेवीवरील व्याज
देखिल दिपावलीपुर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणेचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. तसेच कारखाना कायम व हंगामी कामगारांसाठी दिपावलीकरीता १५ टक्के अॅडव्हान्स बोनस देणेचा निर्णय घेणेत आलेला आहे.
तसेच कारखान्याचा गाळप हंगाम सन २०२०-२०२१ दि.२७/१०/२०२० रोजी
सुरु झाला असून आजअखेर २८,४८४ मे.टन ऊसाचे गाळप होवून २२,१०० क्विंटल
साखर उत्पादित झालेली आहे. चालू गळीत हंगामाकरीता कार्यक्षेत्रामध्ये ३२,९४९ एकर
क्षेत्रावर ऊस लागवड झालेली असून त्यापासून अंदाजे १२.५० लाख मे.टन इतका ऊस
गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. तसेच गाळप हंगाम २०२१-२०२२
करीता आजअखेर २१७४० एकर ऊस लागवडीची नोंद झालेली आहे. तरी २०२०२०२१ हा गळीत हंगाम सुरळीतपणे पार पाडणेसाठी गतवर्षीप्रमाणे सर्व सभासदांनीसहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष .पुरुषोत्तमदादा जगताप केले आहे.