बारामतीत संपन्न झाला अभाविप बारामतीचा जिल्हा अभ्यासवर्ग

Admin
बारामतीत संपन्न झाला अभाविप बारामतीचा जिल्हा अभ्यासवर्ग

बारामती : प्रतिनिधी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा बारामती जिल्हा अभ्यास वर्ग बारामती येथे झाला .यामध्ये दौड ,इंदापूर, सासवड, पुरंदर, व बारामतीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. म.ए.सो हायस्कूलच्या सभागृहात जिल्हा अभ्यास वर्ग संपन्न झाला. या वेळी पियाजोचे मॅनेजर किरण जोशी, पुणे विभाग संघटन मंत्री रोहित राऊत अभाविप जिल्हा संयोजक समीर मारकड, जिल्हा अभ्यासवर्ग प्रमुख अजय चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
     प्रास्ताविक जिल्हा संयोजक समीर मारकड यांनी केले.दिवसभर झालेल्या या सत्रात सैद्धांतिक भूमिका पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत, कार्यकर्ता व्यवहार शुभम अग्रवाल व स्मुर्तीताई इंगळे यांनी घेतली. व्यवहारिक प्रशिक्षण यामध्ये सोशल मीडिया हे सत्र विक्रम शिंदे व आंदोलन सत्र जिल्हा संयोजक समीर मारकड, अभाविप कार्यपद्धती पुर्व कार्यकर्ते अमीत देवकाते व सौरभ शिंगाडे यांनी चालविले.
         घोषणा व समारोप पुणे विभाग संघटनमंत्री रोहित राऊत यांनी केली.
To Top