बारामती तालुक्यात या तारखेपासून दिले जाणार पोलिओ डोस : वाचा सविस्तर

Admin
बारामती तालुक्यात या तारखेपासून दिले जाणार पोलिओ डोस : वाचा सविस्तर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

 बारामती शहरात ३१ जानेवारी २१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वयोगटातील बालकांस पोलिओ डोस देण्यात येणार आहे. 
          काही बालके पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहतात त्यामुळे पोलिओचे उच्चाटन होण्यास अडचण निर्माण होते. त्यासाठी या मोहिमेचा  सर्वांनी लाभ घेणे आवश्यक आहे. उपजिल्हा रुग्णालय, बारामती  यांच्यामार्फत एकूण ६२ बूथ केले आहेत. तरी सर्व संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, बारामती यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
To Top