ठरलं तर...२९ जानेवारी सकाळी ११ वाजता कवी मोरोपंत नाट्यगृह बारामती : सरपंच आरक्षण सोडत

Admin
ठरलं तर...२९ जानेवारी सकाळी ११ वाजता कवी मोरोपंत नाट्यगृह बारामती : सरपंच आरक्षण सोडत

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------

 जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार  सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम दि. २९ जानेवारी २१ रोजी  निश्चित केलेला आहे. सदर सोडतीचे वेळी काढलेले आरक्षण हे सन २०२१-२०२५ या मुदतीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी लागू राहील.
         बारामती तालुक्यातील आरक्षण सोडत कार्यक्रम हा दि २९ जानेवारी २१ रोजी सकाळी ११ वाजता  कवी मोरोपंत नाट्यगृह , बारामती येथे  तहसीलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सदर आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्व  लोकप्रतिनिधी व नागरिकांना उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन तहसीलदार विजय पाटील यांनी एक प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
To Top