निरा - वाल्हे दरम्यान महिलेला रेल्वेने ठोकरले : महिला जागीच ठार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे - मिरज रेल्वे लोहमार्गाचे दुपदरीकरण सुरू आहे. या दुपदरीकरणाच्या कामावरील महिलेला नीरा - वाल्हे दरम्यान भरधाव रेल्वेने जोरदार ठोकरले. या ठोकरीत महिला जागीच ठार झाली आहे. उमा मायाराम बारकाईने वय ४० असे म्रुत्य झालेल्या महिलेचे नाव आहे.
नीरा पोलीस दुरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार मयत महिलेचे पती मायाराम तुकाराम बारे वय ४५ मुळ रहिवासी मध्यप्रदेश, हल्ली तांबवे यांनी जेजूरी पोलीसात फिर्याद दिली आहे. नीरा - वाल्हे दरम्यान रेल्वे मार्गावरील जेऊर गेट नं. २८ च्या जवळ भरधाव गाडी नं. ०२६३० संपर्क एक्स्प्रेसने रेल्वे रुळाचे काम करणाऱ्या महिलेला उडवले. सद्या रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणाचे व नव्या कँबिनचे काम सुरु आहे. हे काम जेऊर रेल्वे गेटच्या आसपास कंत्राटी कामगार महिला व पुरुष करत होते. दुपारी १:२० च्या दरम्यान कामसुरु असलेल्या ठिकाणी साप निघाल्याचा आरडाओरडा झाला, सापाच्य भितीने महिला रेल्वे रुळावर गेली व त्याच वेळी वाल्हे येथून नीरेच्या दिशेने वेगात संपर्क एक्सप्रेस चालली होती. या एक्सप्रेसची जोरदार धडक या महिलेला बसली व ती जागीच ठार झाली.
COMMENTS