सोमेश्वर विद्यालयात विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील सोमेश्वर विद्यालयामध्ये ज्येष्ठ शिक्षिकेची मुलाखत, महिला शिक्षकांचा व स्वच्छता कर्मचारी महिलांचा सन्मान, काव्यवाचन, भाषण अशा विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात आला.
कोरोनाचे सर्व नियम पाळून विद्यालयातील तेरा शिक्षिका तसेच स्वच्छता करणाऱ्या तीन कर्मचारी महिलांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य एस पी जगताप म्हणाले, मुलगी शिकली की दोन घरांची आणि समाजाची प्रगती होते व हिच ज्योत पुढे देशाला समृद्ध करते. महिलांचा सम्मान म्हणजे देशभक्तीचे मानस होय असे विचार अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले. यावेळी अनिल भोसले, शरद रणवरे सर उपस्थित होते.
कार्यक्रमात आर. एस. शेंडकर यांनी ऊसतोडणी कामगार महिला तसेच मध्यमवर्गीय महिला यांच्या व्यथा मांडणाऱ्या कविता सादर केल्या. तर ' कालचा विद्यार्थी व आजचे शिक्षण ' या विषयावर सुरेखा पोतदार यांची मनीषा खोमणे यांनी मुलाखत घेतली. पोतदार यांनी रोखठोक मते व्यक्त करून शिक्षणाची जागरूकता, कल्पकता यावर भाष्य केले. मनिषा खोमणे यांनी विविध प्रश्नातून त्यांच्या प्रदीर्घ शिक्षण वाटचालीतील पैलू अचूक वेधून कार्यक्रमात रंगत आणली. शाळेच्या वतीने महिला शिक्षिकांना धूळपेरणी हा दिवाळी अंक देण्यात आला. ललिता पिसाळ यांनी महिला आणि सद्यस्थिती या विषयावर मात्र मांडली..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र झुरंगे यांनी तर सूत्रसंचलन सुभाष तिटकारे यांनी केले. आभार अनिल भोसले यांनी मांनले.
COMMENTS