सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी नजीक मळशी येथील आळंदीबाई मोहन सरतापे या ७२ वर्षांच्या आज्जीने नातवांच्या अग्रहास्तव निरा डावा कालवा दोन वेळा आर पार केला.
वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी या ठिकाणी पाच फाटा सोळा आंबा या ठिकाणी त्यात्या सरतापे हा आपल्या मुलांना पोहायला शिकवायला घेऊन निरा डाव्या कालव्यावर घेवून आला होता. त्याच वेळी त्या मुलांची आज्जी डोक्यावर सरपण घेऊन घरी निघाली होती. नातवांनी हाक दिली...ये...आज्जी ये पोहायला....आज्जी म्हणटली नक्की ना....नातू बोलला ये ग आज्जी आम्ही शिकवतो तुला पोहायला....आज्जीने डोक्यावरच सरपणाच ओझं खाली टाकलं... आणि नातवांच्या आग्रहाखातर तिने चक्क निरा डाव्या कालव्यात सूर मारला...७२ वर्षाच्या आजीचं पोहणं पाहून नातवांनी तोंडात बोट घातली....
COMMENTS