संजय गांधी, श्रवनबाळ, निवृत्त, वृद्धापकाळ सर्वच योजनेचे २ कोटी ३१ लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा : ११,९३८ जणांना मिळणार लाभ

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
     
बारामती तालुका व शहरातील सर्व संजय गांधी योजनेतील लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, इंदीरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदीरा गांधी विधवा योजना व इंदीरा गांधी अपंग योजनेतील सर्व पात्र व मंजूर असलेल्या 11,938 लाभार्थींना एप्रिल व मे 2021 या 2 महिन्यांचे व श्रावण बाळ योजनेचे राहिलेल्या मार्च महिन्यासहित सर्व एकत्रित अनुदान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार  यांचे सूचनेनुसार कोविड -19 लॉकडाऊन मदत म्हणून एकूण 2,31,77,100 (दोन कोटी ऐकतीस लाख सत्याहात्तर हजार शंभर) रुपयाचे अनुदान पुणे जिल्हा मध्यवर्ती सह,बँकेच्या बारामती तालुक्यातील सर्वच शाखांमध्ये संजय गांधी निराधार योजना शाखा मा.तहसीलदार सॊl बारामती यांचे कार्यालयाकडून बँकेमध्ये जमा करण्यात आले आहे.
To Top