प्रा.नामदेव जाधव सेट परीक्षा उत्तीर्ण

Admin

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठानचे  कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सहा. प्रा. नामदेव शंकर जाधव भूगोल विषयाची  महाराष्ट्र एलिजिबिलिटी टेस्ट  ( MH - SET ) परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 
      सध्या ते सुपे , कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, सुपे या ठिकाणी भूगोल विभागात कार्यरत आहेत.  त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्या सुनेत्रा पवार व राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस बारामती सुचित्रा साळवे यांनी विशेष अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील सर  , सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.
To Top