सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
राज्यात उदभवलेल्या कोरोनाच्या भीषण परिस्थितीमुळे रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार ,
संग्रामदादा मोरे मित्र मंडळ व गिरिजा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील मोढवे येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत हे रक्तदान शिबिर मोढवे येते पार पडले.
या वेळी मित्र परिवाराच्या वतीने ३३ बॅग रक्तदान करण्यात आले .या वेळी माजी सरपंच हनुमंत बालगुडे, निरा बाजार समिती माजी चेअरमन बाळासाहेब मोरे, संग्राम मोरे, माजी उपसरपंच राहुल बनकर, सदस्य सुनिल मोरे ,सतिष शिंदे, जयराम भगत,अजित वाघमोडे,व तरुण मंडळ मोढवे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले .
COMMENTS