गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, पृथ्वीराज चव्हाण, राजू शेट्टी यांचेकडून काकडे कुटुंबियांचे सांत्वन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती तालुक्याचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे नुकतेच झाले. राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मा खासदार राजू शेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज निंबुत या ठिकाणी काकडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. 
         माजी खासदार संभाजीराव काकडे उर्फ लाला यांचे सोमवारी पुणे येथे राहत्या घरी वृद्धपकाळाने ८९ व्या वर्षी निधन झाले. ते बारामती मतदार संघातुन दोनवेळा खासदार तर एक वेळा आमदार म्हणून निवडून  गेले होते. आज निंबुत येथे त्यांच्या मूळगावी निरानदी काठी दशक्रिया विधी पार पडला. यावेळी मान्यवरांनी शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांच्या निवासस्थानी भेत देत काकडे कुटुंबियांचे सांत्वन  यावेळी श्यामकाका काकडे,   बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पृथ्वीराज काकडे, कुलदीप कोंढे,प्रकाश भोईटे आदि उपस्थित होते.
To Top