सोमेश्वर रिपोर्टर टीम------
संतोष भोसले
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेल्या शहानूर शेख यांनी रमजान ईद निमित्त समाजहित व माणुसकीची जाणीव ठेवत गावातील गोरगरीब गरजू 25 कुटुंबाना स्वखर्चातुन अन्नधान्य किट, सुकामेवा इत्यादीचे वाटप करून त्यांच्यासोबत ईद साजरी केली.
शेख यांनी आपला रमजान ईदसाठी होणारा अनावश्यक खर्च टाळुन अतिशय साध्या पद्धतीने यावर्षीची ईद साजरी ठरविले. सद्या कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे लागलेली सर्वत्र संचारबंदी यात अनेक हातावर पोट भरणारी कुटुंब ही रोजगार व कामधंदे अभावी आर्थिक संकटात ओढवलेली गेली आहे. अशा संकटाच्या समयी समाजाला आपले देणे म्हणुन सामाजिक कर्तव्याची जाणीव राखुन ग्रामसेवक शेख यांनी गावातील गोरगरीब गरजू 25 कुटुंबाना स्वखर्चातुन अन्नधान्य किट, सुकामेवा इत्यादीचे नुकतेच गावातील तरूणांच्या मदतीने घरपोच वाटप केले. गरजूंना अडचणीच्या काळात अन्नधान्य मिळाल्याने त्या कुटुंबाची महिनाभराची चिंता मिटली आहे. गतवर्षी ही लाॅकडाऊन काळात आणि रमजानच्या पवित्र महिन्यात गरजूंना शेख यांनी मदत केली होती. शेख यांनी गावामध्ये सामाजिक व विधायक उपक्रम राबवत एक आदर्श निर्माण केला असुन त्यांनी केलेल्या या कार्याचे परिसरात कौत्तुक केले जात आहे.
जात- पात, धर्म- भेद बाजूला ठेवून कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे गरीब आणि गरजु नागरिकांना मदतीची आवश्यकता आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी, उद्योजकांनी, व्यावसायिकांनी व इतर नागरिकांनी समोर येऊन मदत करावी, तसेच या संकटाच्या काळात प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन शेख यांनी यावेळी केले .
-
COMMENTS