सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती यांचे फेसबुक चे फेक अकाउंट काढत हॅकरने तब्बल १५ हजाराची मागणी केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
वाघळवाडी येथील बारामती तालुका मराठा महासंघाचे बारामती तालुका उपाध्यक्ष अभिजित जगताप यांना हा अनुभव आला आहे. हॅकर आणि अभिजित जगताप यांच्यात काल रात्री फेसबुक मेसेंजरवरून चर्चा झाली यामध्ये प्रमोद काकडे यांचे फेक अकाउंट काढून हॅकरने जगताप यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र अभिजितच स्वतः msc करून नोकरीच्या शोधात असल्याने हॅकर ची मागणी पूर्ण करता न आल्याने हॅकर ने जगताप यांना ब्लॉक केले आहे.
असाच प्रकार गेल्या आठवड्यात सोमेश्वरनगर येथील डॉ सुधीर कदम यांच्या बाबत घडला होता. हॅकरने डॉ कदम यांचे फेक अकाउंट काढत डॉक्टर यांचे मित्र ग्रामसेवक हनुमंत भंडलकर यांच्याकडून दहा हजार उकळले होते.
COMMENTS