सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सभासदांचे आरोग्य विमा उतरावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते गौतम काकडे यांनी सोमेश्वर कारखान्याकडे केली आहे.
याबाबत सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये म्हनटले आहे की, सद्या राज्यात कोरोना संसर्गाला लोकांना सामोरे जावे लागत असुन सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने प्रत्येक सभासदांचा वार्षिक दोन लाख रुपयांचा आरोग्य विमा उतरवला असून यामुळे कोविड काळात माळेगावच्या अनेक सभासदांना याचा लाभ झाला आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याने देखील अशाप्रकारची विमा योजना राबवावी अशी मागणी यावेळी गौतम काकडे यांनी केली आहे. यावेळी adv. नवनाथ भोसले, पत्रकार महेश जगताप, पत्रकार युवराज खोमणे, शरद जागताप आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS