सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

जप्त वाहनांचा 12 ऑक्टोबर रोजी ई-लिलाव

जप्त वाहनांचा 12 ऑक्टोबर रोजी ई-लिलाव

पुणे- मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्याअंतर्गत जप्त केलेल्या 10 वाहनांचा जाहिर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे.

            वाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात 1 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2021 दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यात बस, ट्रक, डी.व्हॅन या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील. याची  वाहन मालक, चालक, वित्तदाते यांनी नोंद घ्यावी.

            ई- लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय-पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगांव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय- पिंपरी चिंचवड यांचे सूचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छूक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी वाहने अटकावून ठेवलेल्या स्थळी करता येईल.

            जाहिर ई - लिलावात सहभागी होण्यासाठी 1 ते 6 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल.

            ऑनलाईन नाव नोंदणी झाल्या नंतर 1 ते 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रत्येक वाहनासाठी रु.5 हजार रकमेचा डेप्युटी आरटीओ पिंपरी चिंचवड या नावे अनामत रक्कमेचा धनाकर्षा सह ऑनलाईन सादर केलेल्या  कामगदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी व  मान्यतेसाठी सादर करणे गरजेचे आहे.

            लिलावाचे अटी व नियम शुक्रवार 27 सप्टेंबर 2021 पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथील नोटीस बोर्डावर सकाळी 10  ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. सदर वाहने 'जशी आहेत तशी' या तत्वावर जाहिर ई- लिलावाद्वारे विकली जातील.

            कोणेतेही कारण न देता सदर जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी, पिंपरी चिंचवड यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत, असे कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.

COMMENTS

Name

blogg,2,breaking,1,Breaking New,1,Breaking News,2154,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,3,karate,1,video,1,क्राईम,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : जप्त वाहनांचा 12 ऑक्टोबर रोजी ई-लिलाव
जप्त वाहनांचा 12 ऑक्टोबर रोजी ई-लिलाव
https://lh3.googleusercontent.com/-nSewSv8IKz0/YVg2iUzyG_I/AAAAAAAADOk/Hwjc4bWqjuMO8kAjoO0eebtNhvkrB4nwwCLcBGAsYHQ/s1600/1633171079395101-0.png
https://lh3.googleusercontent.com/-nSewSv8IKz0/YVg2iUzyG_I/AAAAAAAADOk/Hwjc4bWqjuMO8kAjoO0eebtNhvkrB4nwwCLcBGAsYHQ/s72-c/1633171079395101-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/10/12.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/10/12.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy