सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सासवड : प्रतिनिधी
करोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वजनिक कामाच्या निधीला कात्री लागली होती. त्यामुळे निधी देण्यास मर्यादा येत होत्या. परंतु खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुचणा केल्या प्रमाणे पुरंदरमधील अनेक गावांना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यामध्ये चांबळीला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. त्याचबरोबर पुरंदर तालुक्याला बारामती पेक्षा जास्तीचा निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल असे पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले
चाबळी (ता पुरंदर) येथील पानंद नंबर २ या रस्त्या साठी १५ लक्ष रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यानंतर या कामाचे भूमिपूजन प्रसंगी प्रमोद काकडे बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, ठेकेदारानी काम दर्जेदार पद्धतीने करणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील गुळूंचे, राख, पिलानवाडी, पांगारे, भागातील गावांना देखील निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यानी सांगितले.
गावातील शेतकऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला चिरीमिरी न मागता काम दर्जेदार पणे करून घ्यावे व ठेकेदाराने सुद्धा काम दर्जेदार पद्धतीने केले पाहिजे असे जिल्हा परिषदेचे जलसंधारण समितीचे सदस्य योगेश फरतडे यांनी सांगितले.
तर प्रास्ताविकात वामन कामठे यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षापासून या रस्त्यावर कोणत्या ही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. चांबळी येथील पानंद नंबर १ साठीसुद्धा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी कामठे यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषद जलसंधारण समितीचे सदस्य योगेश फरतडे, संचालिका शिक्षण विभाग पुणे मिना शेडकर, रामभाऊ बोरकर, कल्याण कामठे, पोपट झेंडे, प्रकाश भालेराव, मारुती कामठे, संदीप कदम, वामन कामठे, सरपंच प्रतिभा कदम, संजय कामठे, शाखा अभियंता संतोष नलावडे, भाऊसाहेब कामठे, नाना शेंडकर, जगन्नाथ शेंडकर, गोपाळ कामठे, मणिषा कामठे, वैजंता शेंडकर, स्वाती शेडकर, रामभाऊ शेडकर, संतोष कटके, दादा पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन कामठे यांनी केले तर सूत्रसंचालन मारुती कामठे यांनी केले व आभार तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब कामठे यांनी आभार मानले.
COMMENTS