सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरील खोपी ता.भोर येथील फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या परिसरात असलेल्या नवंगुरु इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमधील ४८ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे. यातील बहुतांश मुली या परराज्यातील आहेत .या विद्यार्थिनी नवगुरु इन्स्टीट्युटमध्ये सॉफ्टवेअर प्रोफेशनलचे प्रशिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.४८ विद्यार्थिनींनीपैकी २६ विद्यार्थिनी यांच्यावर भोर येथील उपजिल्हा रुग्णालय तर २२ मुलींवर नसरापूर येथील आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत .या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद साबळे यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार सर्व मुली या फ्लोरा यिस्टिट्यूड टेक्नॉलॉजी येथील गुरुकुल इन्स्टिट्यूड येथे वास्तव्यास असून त्यात त्यांची खाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे.ररविवार दि.२६ रात्री जेवण केल्यानंतर सोमवार दि-२७ सकाळी ५ ते १० मुलींना पोट दुखीचा उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला .परंतु त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही .सोमवारी रात्रीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने मंगळवार दि- २८ त्यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.
COMMENTS