सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सूपे याठिकाणी मतदार भेटीसाठी संपर्क दौरा आयोजित केला होता.
यावेळी सूपे आणि परीसरातील सर्व वर्गातील मतदार प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर तसेच दत्तात्रय येळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी होळकर यांनी उपस्थित मतदार प्रतिनिधी यांना मार्गदर्शन केले यावेळी दुध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत गावडे, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पंचायत समिती सदस्य निता बारवकर , सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरीभाऊ भोंडवे माजी संचालक गणेश चांदगुडे, पोपट पानसरे, राहूल वाबळे, अनिल हिरवे, शौकत कोतवाल, जालिंदर चांदगुडे, राजकुमार लव्हे, संपत जगताप, उषाताई भोंडवे, नंदाताई खैरे,बी के हिरवे व उतर मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS