बारामती ! सायांबाचीवाडी येथील मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील सायांबाचीवाडी येथील मारहाण प्रकरणी तीन जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
       याबाबत अंकुश मल्हारी जगदाऴे  रा सायंबाचीवाडी ता बारामती जि पुणे   यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी प्रकाश गोविंद गायकवाड,निलेश प्रकाश गायकवाड  व मंगेश प्रकाश गायकवाड  सर्व रा सायंबाचीवाडी ता बारामती जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
         पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार  दि 23/12/2021 रोजी  सायं 07:30वा चे सुमारास मी फिर्यादी घरा समोर असताना इसम नामे प्रकाश गोविंद गायकवाड हा फिर्यादी समोरुन जात असताना फिर्यादींनी  त्यास काल  तुम्ही आमचा दरवाजा विनाकारण का वाजवत होता  आणि आम्हाला शिवीगाऴ का करत होता असे विचारले असता प्रकाश गोविंद गायकवाड हा तेथुन पऴुन जावुन त्याचे घरातील त्याची मुले 1) निलेश प्रकाश गायकवाड 2) मंगेश प्रकाश गायकवाड रा सायंबाचीवाडी ता बारामती जि पुणे  यांना सोबत घेउन माघारी आला आणि फिर्यादीस शिवीगाऴ करुन प्रकाश गोविंद गायकवाड याने त्याचे हातातील लाकडी काठीने फिर्यादीचे डावे हाताचे पोटरीवर मारले त्याचवेळी  निलेश प्रकाश गायकवाड  याने त्याचे हातातील काठीने फिर्यादीचे डावे कानाजवऴ मारले त्याचवेळी मंगेश गायकवाड याने त्याचे हातातील काठीने फिर्यादीचे नाकावर मारले त्यावेऴी फिर्यादीचे नाकातुन रक्त येऊ लागल्याने ते  जागीच खाली पडले  .त्यावेऴी त्यांना  सोडविण्यासाठी त्यांचा  भाचा नातेश्वर अंकुश बर्गे  हा आला असता त्याला देखिल निलेश गायकवाड याने त्याचे हातातील काठीने त्याचे उजवे हाताचे अंगठ्यावर मारुन जखमी केले आहे त्यावेळी फिर्यादीचे नाकातील रक्त आल्याचे पाहुन ते तिघेजन तेथुन  शिवीगाऴ दमदाटी करुन निघुन गेले  वैगरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा रजि.दाखल करुन दाखल गुन्हयाचा वर्दि रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती येथे रवाना करून गुन्हयाचा पुढील  तपास पोना मनेरी 2435  हे करीत आहे
-
To Top