बारामती ! बेळगाव येथील एकाकडून १ लाख २० हजाराची फसवणूक वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील राजे प्रतिष्ठाण संचलीत मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) खंडूखैरेवाडी, सुपे, ता बारामती, जि. पुणे या संस्थेची एक लाख वीस हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी बेळगाव येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          याबाबत उध्दव कल्याणराव वाबळे, वय ४९ वर्षे धंदा नोकरी, रा. देऊळगाव रसाळ, ता. बारामती, जि.पुणे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
पोलिसांनी बाजीराव सदाशिव घोरपडे, रा. बेळगाव राज्य कर्नाटक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 
               पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1/2/2020 ते  17/06/2021 चे  तारीखेस  वेळी व ठिकाणी  यातील यातील आरोपी इसम नामे बाजीराव सदाशिव घोरपडे रा.बेळगाव राज्य कर्नाटक याने आमचे राजे प्रतिष्ठाण संचलीत मयुरेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) खंडूखैरेवाडी, सुपे, ता बारामती, जि. पुणे मध्ये वाढीव 11 तुकडांच्या एलओआय करिता शासनाकडे भरनेसाठी त्यांचे खात्यावर पाठवलेले 1,20,000/- रुपये त्याने डायरेक्टर ऑफ व्होकेशनल अँण्ड एज्युकेशन ट्रेनिंग (डीव्हीइटी या विभागाकडे न भरता फिर्यादी यांना  एक्सीस बँकत पैसे भरल्याची खोटी रिसीट पाठवून फिर्यादी यांचे संस्थेची फसवणूक केली आहे  वैगरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा रजि.दाखल करुन दाखल गुन्हयाचा वर्दि रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती येथे रवाना करून गुन्हयाचा पुढील  तपास  सहा फौजदार डी एस जाधव  हे करीत आहे
---
To Top