सोमेश्वर रिपोर्टर टीम------
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामाकरीता कारखान्याने आजअखेर ३ लाख ३९ हजार मे. टनाचे गाळप पुर्ण केले असुन सभासदांनी नोंदलेल्या जवळपास ११ लाख २० हजार मे.टन ऊसाचे अदयापही गाळप बाकी असुन या संपुर्ण ऊसाचे गाळप वेळेत पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशिल असुन सभासदांचा ऊस वेळेत गाळपास नेण्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रालगतच्या कारखान्यांसोबत पत्रव्यवहार व बोलणी सुरु असुन ब-याच कारखान्याने अदयाप प्रतिसाद न दिल्याने कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्र अजित पवार यांच्या सहकार्याने त्यांचेसोबत बोलणी सुरु असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, गाळप हंगाम सन २०२१-२२ करीता आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आडसाली १८४९० एकर ऊसक्षेत्रातुन अंदाजे सरासरी ४७ मे.टन प्रति एकरी सरासरीने ८८७५६०० मे टन, पुर्वहंगामी ५४८७ एकर ऊसक्षेत्रातुन अंदाजे सरासरी ३७ प्रति एकरी टनेज पकडता २०३०१९ मे टन, सुरु ३४१९ एकर ऊसक्षेत्रातुन अंदाजे सरासरी ३१ प्रति एकरी टनेज पकडता १०५९८९ मे टन व खोडवा ९४२६ एकर ऊसक्षेत्रातुन अंदाजे सरासरी २८ प्रति एकरी टनेज पकडता २६३९२८ मे टन असे एकूण ३६८२२ एकर नोंद ऊसक्षेत्रातुन अंदाजे १४,६०,५५९ मे.टन ऊस उपलब्ध होईल यापैकी कारखान्याने आजअखेरची सर्वोच्च गाळप क्षमता राखण्याचा प्रयत्न करीत जवळपास ३ लाख ४० हजार मे.टनाचे गाळप पुर्ण केले असुन अदयापही ११ लाख २० हजार मे.टन ऊसाचे गाळप बाकी आहे. सरासरी आपली सर्वोच्च गाळप क्षमता राखित आपण गाळप करण्याचा प्रयत्न केल्यास आपले संपुर्ण गाळप होण्यास साधारण माहे मे अखेर पर्यंत आपणास थांबावे लागणार आहे. यामध्ये आपला
आडसाली मधील सातव्या महिन्याचे एकुण १७७३५ एकर नोंदलेले क्षेत्र असुन त्यापैकी अदयापही ११५०० एकर ऊस गाळपाचा शिल्लक असुन सोबतच आपल्या कारखान्याचे आडसाली हंगामाचे एकुण क्षेत्र १२२४० एकर शिल्लक असुन यातुन अंदाजे ५७५००० मे.टन ऊस उपलब्ध होणार आहे. सदरचा ऊस आपण प्राधान्याने गाळप करीत असुन त्याचबरोबर खोडवा व पुर्व हंगामातील लवकर पक्व होणा-या जातींचे आपण २५ डिसेंबरपासुन तोड सुरु करणार आहोत. त्यामुळे आपल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यास संचालक मंडळ प्रयत्नशिल आहोत. सभासदांना बाहेरील कारखान्यास नोंदलेला ऊस गाळपास दयावयाचा असल्यास त्यास कारखान्याची परवानगी घेवुन बाहेर गाळ्पास देवु शकता तसेच नोंदलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप करण्यासच माहे मे अखेर कालावधी लागणार असल्याने बिगर नोंदीचा व नियमबाह्य ऊसाची सभासद शेतक-यांनी परस्पर विल्हेवाट लावल्यास त्यास कारखान्याची काही हरकत नसेल कारण नोंदिचाच ऊस जास्त असल्याने बिगर नोंदिचा ऊस आपण गाळप करु शकणार नाही असेही जगताप म्हणाले.
COMMENTS