सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद येथील नगरपंचायतची उर्वरित चार प्रभागासाठीचे प्रभागनिहाय महिला आरक्षण आज नगरपंचायत सभागृहात सोडत पध्दतीने करण्यात आली.
लोणंद नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थगिती देण्यात आलेल्या चार ओबीसी आरक्षणाबाबत खुल्या प्रभागातून निवडणूक घेण्याच्या सुचना राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आज येथील नगरपंचायत सभागृहात नगरपंचायत एक, दोन ,अकरा व सोळा या चार खुल्या झालेल्या प्रभागाची महिला आरक्षण सोडत प्रांतधिकारी शिवाजीराव जगताप, मुख्याधिकारी हेमंत ढोकले , शंकर क्षीरसागर, रोहित निंबाळकर, विजय बनकरआदीच्या उपस्थितीत सोडत पध्दतीने हे आरक्षण करण्यात आले.
आज जाहीर झालेल्या सोडतीनुसार प्रभागनिहाय आरक्षण पुढील प्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण माहिला , प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक अकरा सर्वसाधारण , प्रभाग क्रमांक सोळा सर्वसाधारण अशी सोडत निघाली आहे.
COMMENTS