सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
जन्मापासून मृत्यूपर्यंत समाजातील सर्व व्यक्ती ग्राहक आहेत. जवळीक साधून कार्य केले तर प्रत्येक गोष्टीत मार्ग निघतो व प्रश्न मार्गी लागतात.यामुळे ग्राहकांनी संयम व समन्वय साधून जागृत रहावे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत भोर तालुका ,अन्न -नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षन विभाग व तहसील कार्यालय भोर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले.
यावेळी तहसीलदार सचिन पाटील तसेच गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी ग्राहकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायत भोर तालुकाध्यक्ष जमीर आत्तार,महावितरण अधिकारी संतोष चव्हाण,अनिल गिरे,शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष प्रकाश बढे,सर्कल जालिंदर बरकडे,पी.एस. लहारे,किसन रोमन ,माजी पं. समिती सदस्य अण्णासाहेब भिलारे, सोमनाथ वचकल तसेच रेशनिंग दुकानदार,व्यवसायीक व नागरिक उपस्थित होते.
COMMENTS