सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
दिड वर्षाची प्रदिर्घ प्रतिक्षा संपवून इयत्ता १ ली ते ४ थी चे विद्यार्थी शाळेला आलेले आहेत. अशातच शाळेतील अनेक उपक्रमांची शिक्षकांप्रमाणेच विद्यार्थ्यांना ओढ लागली आहे.
या समिश्र भावनांमध्येच विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल, सी.बी.एस.ई., सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे आनंदात नाताळ साजरा केला गेला.
सध्याच्या परिस्थितीचे भान राखत व सामाजिक अंतर पाळत प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागातील मुलांनी दोन सत्रात नाताळ साजरा केला.
सामाजिक अंतर राखत मुलांनी नाताळबाबाचे स्वागत केले व त्याने वाटलेल्या भेटवस्तू व खाऊचा आनंद घेतला. यावेळी शाळेतील संगीत संच 'स्वरांधरा' ने सुमधूर गाण्यांनी वातावरण मंत्रमुग्ध केले.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी मुलांबरोबर कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व मुलांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील शिक्षिका प्रिती जगताप यांनी प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमाचे तर साधना शिंदे यांनी माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
COMMENTS