चिंचवड ! जेष्ठ पत्रकार जयराम सुपेकर 'मोरया पुरस्कारा'ने सन्मानित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
 चिंचवड देवस्थान ट्रस्ट व  पिंपरी चिंचवड महानगरपालीका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या श्रीमन् महासाधू  मोरया गोसावी संजीवनी समाधी सोहळ्याची आज दि .२५ रोजी सांगता झाली. या उत्सवाच्या निमित्ताने दिला जाणारा श्री मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार सुनेत्राताई अजितदादा  पवार तर मोरया पुरस्कार सुपे येथील  जेष्ठ पत्रकार  जयराम मारुती सुपेकर यांसह ईतर १३ व्यक्तींना दिला . सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य केल्याबद्दल या  सर्वांना  पुरस्काराने गौरवण्यात  आले .
           संजीवनी समाधी सोहळ्याच्या पुर्वसंध्येस झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी  मावळ लोकसभा मतदारसंघाचे  खासदार  श्रीरंग बारणे , मुख्य पुरस्कारर्थी  तथा  बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा  सुनेत्रा  पवार , चिंचवड   देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव , विनोद पवार , विश्राम देव ,हभप आनंद महाराज तांबे , राजेंद्र उमाप , पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे  नगरसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते .
          बारामती तालुक्यातील सुपे  येथील प्राजक्ता मतीमंद स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयराम मारुती सुपेकर  यांनी समाजातील मतीमंद  मुलांचे पालन पोषण करुन  समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे .  सुपेकर हे प्रवचनकार असुन त्यांनी  केलेल्या   समाजाभिमुख कामांचा सन्मान करण्यासाठी त्यांना  मोरया पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . त्यांना सपत्नीक हा पुरस्कार खासदार  श्रीरंगअप्पा बारणे  व चिंचवड देवस्थानचे मुख्य  विश्वस्त  मंदार देव , विनोद पवार ,  विश्राम देव  ,हभप आनंद तांबे , राजेंद्र उमाप यांच्या हस्ते  देण्यात आला . या पुरस्कारानंतर  बोलताना सुपेकर यांनी सांगितले की ,  हा पुरस्कार म्हणजे मोरयाचा आर्शीवाद आहे . कार्यक्रमाचे  प्रस्तावित     राजेंद्र उमाप , स्वागत  विश्वस्त विनोद पवार तर  शेवटी आभार आनंद तांबे यांनी मानले .
To Top