बारामती ! धनुर्विद्या स्पर्धेत सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाच्या अर्पिता अडसुळचा प्रथम क्रमांक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : ता-बारामती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय समिती अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन कला वाणिज्य महाविद्यालय चाकण येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. अर्पिता गणेश अडसुळ हिने  'आर्चरी (रिकोव -बो) ' या खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. 
या स्पर्धेमध्ये जवळपास सतरा महाविद्याविद्यालयांमधुन सत्तरहुन अधिक स्पर्धकांचा सहभाग होता.या स्पर्धेमध्ये अर्पिता अडसुळ हिचा प्रथम क्रमांक आल्याने तिची निवड आंतरविभागीय स्पर्धेसाठी झाली आहे.
तिला श्री.प्रणित सुतार व प्रा. किशोर साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले असुन श्री सोमेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष  आनंदकुमार होळकर , कमीटी अध्यक्ष  शैलेश रासकर , सचिव  भारत खोमणे व सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय बनसोडे व सर्व विद्यमान संचालक यांनी अर्पिता अडसुळ हिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
To Top