सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मु.सा. काकडे महाविद्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात ३४६ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले. शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे-देशमुख व आरोग्य सभापती प्रमोद काकडे युवा मंच आणि मु. सा काकडे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेवा विभाग, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळा संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. सोमेश्वर परिसरात शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महाविद्यालय आणि युवा मंच यांच्या माध्यमातून अशाप्रकारचे विधायक आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु.सा. काकडे महाविद्यालयाचे अध्यक्ष सतिश काकडे होते. बांधकाम सभापती प्रमोद काकडे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, उद्योजक आर.एन.शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवामंचचे प्रमुख व शिबीराचे आयोजक सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे, डॉ. सौरभ काकडे, राहुल काकडे, मदन काकडे यांचे यासाठी सहकार्य लाभले. हडपसर येथीलअक्षय ब्लड बॅंकेच्या माध्यमातून हे शिबीर पार पडले. शिबीर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना शारीरीक शिक्षण व क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रा. अच्युत शिंदे यांनी मानले. या प्रसंगी प्रा. डॉ. जगन्नाथ साळवे, प्रा.डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे, प्रा.डॉ. दत्तात्रय डूबल, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS