सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणीभापकर माळवाडी ता बारामती येथे महावितरणच्या विद्युत तारांमुळे तब्बल १० एकर ऊस जळून खाक झाला.
काल दि २० रोजी दुपारी लोणीभापकर अंतर्गत येणाऱ्या माळवाडी या ठिकाणी हा प्रकार घडला. याठिकाणी एकूण सहा शेतकऱ्यांचा १० एकर ऊस एकमेकांना लागून आहे. दुपारच्या वेळी भर उन्हात आग लागल्याने ही आग आटोक्यात आणणे जिकरीचे बनले होते तरीही ग्रामस्थांनी विद्युत मोटारा सुरू करून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही.
यामध्ये महेश राजेंद्र लोणकर यांचा दीड एकर, अशोक मनोहर जाधव यांचा दीड एकर, संदीप गंगाराम बोरावके यांचा सव्वा एकर,
तुकाराम सखाराम बोरावके यांचा सव्वा एकर, सागर अशोक लडकत यांचा दीड एकर, प्रकाश मोरेश्वर लडकत यांचा दीड एकर व शांताराम मोरेश्वर लडकत यांचा दीड एकर या शेतकऱ्यांचे ऊसाचे नुकसान झाले आहे.
COMMENTS