सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूकदारानी आपल्या विविध मागण्यासाठी संपाचे हत्यार उपसले असून त्यांच्याकडून उसवाहतुक बंद केल्याने कारखान्याचे गाळप बंद पडले आहे. माळेगाव कारखान्याच्या ऊस वाहतूक संघटनेने पुकारलेल्या संपला आमचा पाठिंबा असल्याचे सोमेश्वर ऊस वाहतुक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे यांनी सांगितले.
माळेगाव कारखान्याचा यंदाच्या गाळप हंगामात कारखान्याचा मागील इतिहास पहाता काही वेळा प्रतिदिन उच्चांकी गाळप सुरू असताना संपची ठिणगी पडल्याने कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने यामधून तातडीने मार्ग काढण्याचे प्रयत्न कारखाना प्रशासनाकडून केले जात असल्याचे चित्र आहे. ऊस वाहतूकदाराणी ऊस वाहतूक दर वाढीसह कमीशन वाढवून मिळावे,तसेच संपूर्ण गाळप हंगामात एकाच दराने डिझेल मिळावे,एखाद्या गाडी मालकाचे ऊस तोडणी टोळी कडे पैसे अडकले असले तर सदरचे पैसे वसूल करण्यात कारखान्याने मदत करावी आदी मागण्यांसाठी संप पुकारला आहे. दरम्यान कारखाना प्रशासनाने संपकरी वाहतूक संघटनेच्या प्रतिनिधी बरोबर चर्चा करून मर्ग काढण्याचा प्रयत्न केला,तथापि चर्चा फिसकटल्याने संप सुरू झाला असल्याची माहिती दोन्ही बाजूने देण्यात आली.दरम्यान कारखाना कार्य स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
COMMENTS