सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉ. रेश्मा मोहिदीन पठाण यांना बँकिंग ॲण्ड फायनान्स या विषयात ओपीजीएस युनिव्हर्सिटी चुरू,राजस्थान या विद्यापीठाची डी.लीट. (डॉक्टरेट ऑफ लिटरेचर) ही पदवी मिळाली आहे.
डॉ. रेश्मा पठाण यांनी "Factors affected on Non Preforming Assets: Pune District Central cooperative Bank Ltd." या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. सदर संशोधनासाठी त्यांना डॉ. प्रकाश दिवाकरण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुत्पादक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी हे संशोधन उपयोगी पडणार आहे.
त्यांचा मित्रपरिवार व कुटुंबीयांची त्यांना या संशोधनामध्ये महत्त्वाची साथ मिळाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयं व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, सचिव प्रा. जयवंत घोरपडे, सहसचिव सतीश लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे व महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य यांनी डॉ. रेश्मा पठाण यांचे अभिनंदन केले आहे.
COMMENTS