सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
माळेगाव : प्रतिनिधी
मोलमजुरी करणा-या व शेतकऱ्यांचा मुलिंनी जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाने पोलीस दलात भरती झाल्याने त्यांचे यश प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार शरयु फौंडेशनच्या शर्मिला पवार यांनी काढले.
द परफेक्ट महिला पोलिस अॅकडमीच्या ३३ मुली राज्याच्या विविध जिल्ह्यांत पोलीस सेवेत भरती झाल्या आहेत.सन्मान सोहळ्यात आनंदाश्रुसह अनेकांनी भावना व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त केले.
राज्याच्या पोलिस सेवेत निवड झालेल्या लक्ष्मणराव भोसले संचलित द परफेक्ट महिला पोलिस अॅकडमीच्या ३३ महिला पोलिस व ३ युवकांचा सत्कार समारंभ शरयु फौंडेशनच्या शर्मिला पवार यांच्या हस्ते निवड झालेल्या महिला उमेदवारांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पिडिसी बॅंक संचालक दत्तात्रय येळे,बारामती सहकारी बँक अध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी स्मिता काळे,माजी सरपंच दीपक तावरे, उद्योजक नितीन जाधव, विजय भोसले,कल्याण पांचागणे, योगेश भोसले ,भारत तुपे, नितीन तावरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना लक्ष्मणराव भोसले म्हणाले की,सन २०१४ पासून आजपर्यंत २८० मुली पोलीस सेवेत दाखल झाल्या आहेत.पोलिस भरतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे उभारलेले क्रिडा संकुल उपयोगी पडते आहे.तसेच प्रशिक्षक राहुल पवार, किर्ती पवार, अनिल काटे, राहुल घुले यांचा मोलाचा वाटा आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मणराव भोसले, सुत्रसंचलन प्रा.अनिल धुमाळ,तर आभार प्रफुल्लता भोसले यांनी मानले.
------------------------------------
देशातील मुली विविध क्षेत्रात यशस्वी होत आहे.भरती झालेल्या मुलींचा अभिमान वाटतो आहे.या मुली महाराष्ट्र पोलीसांची देशात शान वाढवतील असा विश्वास वाटत आहे.
शर्मिला पवार- संस्थापक शरयु फौंडेशन
COMMENTS