सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
गोवा राज्यात पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महावितरण किकवी शाखा भोर उपविभाग येथील शिकाऊ कर्मचारी गणेश साळुंके ता.भोर यांनी भाला फेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने गोवा राज्यात भोरच्या महावितरण विभागाचे नावलौकिक सुवर्ण पदकाने झळकले आहे.
सुवर्णपदक विजेते साळुंके यांचा दि .२७ जानेवारी पंचायत समिती भोर येथे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात सत्कार करण्यात आला.यामुळे तालुक्यातून साळुंके यांचे अभिनंदन होत आहे.साळुंके यांना उपकार्यकरी अभियंता संतोष चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सत्कार समारंभ प्रसंगी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सचिन पाटील, जि. प. सदस्य विठ्ठल आव्हाळे, उपसभापती पं. स.रोहन बाठे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे ,कार्यकारी अभियंता महावितरण सासवड अरविंद वनमोरे ,पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS