सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
वाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व सदस्य मंडळाचा कार्यकाळ २६ डिसेबर, २०२१ रोजी समाप्त झाला असल्याने सध्या नगरपरिषदेचा कार्यभार प्रशासक म्हणून मुख्याधिकारी किरणकुमार मोरे पाहत आहेत. ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सफाई कामगारांच्या हस्ते ध्वजारोहण करून पालिका प्रशासनाने एक नवा आदर्श घालून दिला आहे.
दरवषी परंपरेप्रमाणे वाई शहराचे उपनगराध्यक्ष यांच्या
हस्ते नगरपरिषद कार्यालयातील ध्वजारोहण केले जाते. यावर्षी सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपला असल्याने प्रशासक व मुख्याधिकारी यांनी ध्वजारोहण करणे क्रमप्राप्त होते. मागील दोन वर्षांपासून कोविड-१९ च्या महामारीच्या परिस्थितीमुळे वाईकर नगरिकांना अत्यावश्यक त्या सर्व सोयी- सुविधा पुरवण्यासाठी वाई नगरपरिषद अविरत कार्यरत आहे. परंतु वाई शहराचे आरोग्य जपण्यात सफाई कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. कोविडजन्य परिस्थिती, पुरपरिस्थिती, साथीचे रोग अशा नानाविध परिस्थितींमध्ये शहराचो स्वच्छता
आणि परिणामी आरोग्य राखण्यासाठी सफाई कर्मचारी वर्षांनुवर्षे आपले योगदान देत आले आहेत. त्यांच्या ह्या
कामाचा यथोचित सन्मान म्हणून या वर्षी वाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी त्यांचा ध्वजारोहणाचा मान नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्याला देऊ केला आहे. प्रथमच प्रजासत्ताक दिनी वाई नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरील ध्वजारोहण सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने रमेश काळोखे यांच्या हस्ते केले गेले.मुख्याधिका-यांनो परंपरेला मुरड घालून समाजासमोर आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.त्याबददल त्यांचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.
गतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये वाई शहराला मिळलेले यश, शहराला मिळालेला ओडीएफ प्लस प्लस चा दर्जा, कचरामुक्त शहराचे मानांकन या सर्व यशस्वी कामगीरीचे श्रेय मुख्याधिकारी नगरपरिषदेचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच वाईकर नागरीकांना जाते. स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यपुर्ण वाई असा नावलौकीक शहराला मिळण्यासाठी व तो कायम राखण्यासाठी वाईकर नागरिकांनी असेच सहकार्य करत राहावे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी पदाधिकारी, नगरपरिषदेचे कार्यालय अधिक्षक व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS